Sunday, April 19, 2009

क्षितीजाचा पट चंदेरी..



ढगांनी झाकोळला तो क्षितीजाचा पट चंदेरी..
आभाळावर रश्मींच्या चितारल्या लकेरी..

जहांपनाह का महल



जहांपनाह का महल सामने दिख रहा है.
जहांपनाह कोण म्हणून काय विचारताय राव?
नवीन बांधकामं जर लवकर झाली नाहीत तर सुखाची चार वर्षं अजून आयुष्यात...

Inflorescence in carrot.

रंग घेऊनि पलाशफुलांचा



पलाशाचे जर्द लाल रंग, ऋतूंच्या अधरी..
वसंत येता, किलबिल वॄक्षांच्या फांद्यावरी....
रंग घेऊनि पलाशफुलांचा, होळी धुंद सजते...
वासंतिक मंद हवेने गात्र गात्र मोहरते !!!





Monday, March 2, 2009

नकोस विसरू खोपा आपला



जाशील जेव्हा दिगंतरा, तेव्हा स्मरण असू दे या घरट्‌याचे...
वाटेवर त्या लावूनि डोळे, कोड करते शैशवांचे..
अंगणी उतरुनि टिपताना दाणे, नकोस विसरू खोपा आपला...
किलबिल ऐकून तॄप्त होवुनि रे, सजवू आपल्या घरट्‌याला..

पिले विसावून पंखाखाली, स्वप्न देखतील नवे...
उडुनि जातील !!! कधी परततील? कोणाला ते ठावे ???

Tuesday, February 10, 2009

Location - Ausa. Dist Latur.



चंद सदियों पहले यहांपर
शहजादोंके खिदमत में लगे रहते थे कई नौकर चाकर..
बुलंद दरवाजोंपर झूमते हाथी
कई कतारें लगती थी बाशिंदों की...
किया करते थे लाचारी भरे सलाम
झुककर.. घुटनोंपर बैठकर..

अब हालात कुछ ऐसे हैं की
टूटे चरमराते दरवाजों की आवाज..
खामोशी को अचानक चीरकर...
परिंदों के परों की परवाज...

वक्त...हां वक्त के आगे..
बेबस होते हैं.. जागीरों सल्तनतोंके मालिक और नवाब ..

Monday, February 9, 2009

Discipline





Do you mean to say that you can discipline yourself to love, exercise the will to love? When you exercise discipline and will to love, love goes out of the window. By practising some method or system of loving you may become extraordinarily clever or more kindly or get into a state of non-violence, but that has nothing whatsoever to do with love..- J Krishnamurthy


गहराईमें डुबनेसे घबराता ..
पानी के सतह पर जब तैरता हूं..
तालाब पर बन जाती हैं राहें ..
चंद लम्हों के लिये...
फैलती लहर बनकर... :)




Sunday, February 8, 2009



निष्पर्ण रुक्ष शुष्क शिशिरी
झाड बिचारे स्तब्ध..
येती पल्लव सोडुनि जाती
हेच असे प्रारब्ध...

येईल परतुनि
ऋतुराजाची मोहक ती चाहुल...
पक्ष्यांची घरटी फिरुनि पुन्हा
मग फांद्यावर होतील..


Ausa Road Latur. Photo taken from our Terrace.

फोटोग्राफी असो किंवा मग दैनंदिन जीवन, अंधार आला की स्थिरतेकडे लक्ष पुरवावे लागते ...
नाईट फोटोग्राफीला कॅमेरा हलायला नको म्हणून ट्रायपॉड वापरायचा आणि काळोखभरल्या क्षणांमध्ये चित्त विचलीत होवू नये म्हणून प्रार्थना करायची. खरं तर काळोखातच प्रकाशाच्या वाटा उत्तम चितारता येतात.
फक्त स्थिरता महत्वाची.


पळशी तू तरी, नाम कोठे नेशी ।
आम्ही अहर्निशी राम घोकू ॥
आम्हापासोनिया जाता न ये तुज ।
ते हे वर्म, बीज नाम ॥
देवा आम्हा तुझे नाम हो पाहिजे ।
मग भेटी सहजे, देणे लागे ।
भोळे भक्त आम्ही चुकलोचि कर्म ।
सापडले वर्म रामदासा ॥


In Physics, a colour reflected by the object , which is not a part of it, seems to be colour of that object ! The existence hides itself by creating a picture made of colours which are no more the part of existence !!


फोटोग्राफी असो किंवा आपण एखाद्याचे केलेले मुल्यमापन..
Angle ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
जसा जसा आपण Low angle घेतो तसे तसे चित्र आणि व्यक्तिचित्र जास्त व्यापक होत जाते.


मधुघटांची ओढ विलक्षण
सु-मनांचा होतो परिचय..
कणकण वेचुनि सरते जीवन
कासया मधुसंचय ???

ऐकुनि हे म्हणते मजला
सोडी रे स्वार्थमती...
संचय तो दुस-यासाठी
सेवेची धरि वृत्ती...