Monday, July 5, 2010

आभाळाचे अंगण ज्याचे , ते माझे चिमणे घरटे !
पांथस्थाची वाट पहाते , आतिथ्याचे वैभव घेवून ...
आभाळाचे अंगण ज्याचे , ते माझे  चिमणे घरटे   !  

उम्रे दराजसे मांगकर लाये थे चार दिन ...

उम्रे दराजसे मांगकर लाये थे चार दिन ..
दो आरजू में बीते .. दो इंतजार में !

गवतफुला रे ...


मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा... 
.................इंदिरा संत

Saturday, July 3, 2010

स्खलित मनाच्या क्षुद्रतेचे अवघे संकोचीपण ,
वैशाखाच्या वणव्यात जीवाचे भरकटणे ते वणवण..
सहज अनुतापाच्या तेव्हा बरसाव्या धारा , 
दुष्कर्माचा वाहून जाईल, त्यात कीटपसारा ....
आषाढाच्या क्षितिजावरुनि, कृष्णघन तो बरसावा ...
थेंबा थेंबाच्या ओढ़ीने , या मातीतील तृण तृण तरसावा !
कधी सांजेला येई दाटून, काहूर आठवणीचे...
रेशीमधारांनी नेत्रकडेवर , सृजनोत्सव साकारावा !