जाशील जेव्हा दिगंतरा, तेव्हा स्मरण असू दे या घरट्याचे...
वाटेवर त्या लावूनि डोळे, कोड करते शैशवांचे..
अंगणी उतरुनि टिपताना दाणे, नकोस विसरू खोपा आपला...
किलबिल ऐकून तॄप्त होवुनि रे, सजवू आपल्या घरट्याला..
पिले विसावून पंखाखाली, स्वप्न देखतील नवे...
उडुनि जातील !!! कधी परततील? कोणाला ते ठावे ???