लातूरपासून सात किलोमीटर वर हा एक तलाव आहे. गावाचं नांव कव्हा. तिथल्या सूर्यास्ताचे मी घेतलेले काही फोटोग्राफ्स आणि त्यावर मला आवडलेली एका मित्राने इ-मेल केलेली एक कविता एम्बेड केली आहे.
जाशील जेव्हा दिगंतरा, तेव्हा स्मरण असू दे या घरट्याचे... वाटेवर त्या लावूनि डोळे, कोड करते शैशवांचे.. अंगणी उतरुनि टिपताना दाणे, नकोस विसरू खोपा आपला... किलबिल ऐकून तॄप्त होवुनि रे, सजवू आपल्या घरट्याला..
पिले विसावून पंखाखाली, स्वप्न देखतील नवे... उडुनि जातील !!! कधी परततील? कोणाला ते ठावे ???